Thursday 24 March 2016

बिझनेस मंत्रा : रसिक साहित्य


एक अतिशय वयस्कर आजोबा, पुस्तकांच्या दुकानाच्या पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना हातातली काठी घेऊन चढणे शक्यहि नव्हते. त्यांना पाहून त्या पुस्तकांच्या दुकानातला एक कर्मचारी धावत पुढे आला आणि त्या आजोबांशी बराच वेळ चर्चा करत त्यांना एक एक दुकानातली पुस्तके आणून दाखवू लागला. २० मिनटानी आजोबांनी दोन पुस्तकं घेतली आणि मनापासुन धन्यवाद देत त्या कर्मचार्याची पाठ थोपटली.
या दुकानाच नाव आणि ठिकाण होत 'रसिक साहित्य' अप्पा बळवंत चौक, पुणे, ३०
आणि हा प्रसंग बघण्याच निमित्त ठरल ते 'बिझनेस मंत्रा'च्या 'Know Your Member At His Place' या सेशन मध्ये 'रसिक साहित्य' ला भेट देण्याच.
जिथे कर्मचारी वर्गच आपल्या वाचक ग्राहकांची एवढी काळजी घेतात तिथे वाचन संस्कृती जपण्यासाठी किती मनापासून प्रयत्न केले जात असतील याचा अंदाज या दुकानाच्या पायऱ्या चढतानाच आला.
या सेशन मध्ये आमचे सभासद मित्र श्री. योगेश व शैलेश नांदुरकर यांच्याशी इतर सभासदांनी दिलखुलास गप्पा मारल्या आणि 'रसिक साहित्य' हा त्यांचा ५१ वर्षांचा व्यावसायिक वटवृक्ष कसा वाढला हे जाणून घेतल.
त्यांचा व्यवसाय हा खर तर पुस्तक विक्रीचा परंतु ग्राहकाने पुस्तक वाचावे आणि मग विकत घ्यावे यावर यांचा अधिक भर आहे हे लक्षात आले त्यासाठी त्यांनी 'रसिक वाचक योजना' व 'रसिक पुस्तक भेट योजना' अशा खास योजना 'रसिक' वाचकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
वाचकाला केंद्र स्थानी ठेऊन 'रसिक साहित्य'ची वाचकाला सेवा देण्याची हि वाटचाल अशीच चालू राहु देत या बद्दल Yogesh Nandurkar आणि Shailesh Moreshwar Nandurkarया बंधूंना 'बिझनेस मंत्रा'च्या हार्दिक शुभेच्छा !